By  
on  

जीव माझा गुंतला : अंतराची ग्रेट भेट ! पाहा Photos

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका सध्या बरीच गाजते आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जीव या मालिकेत गुंतला असं म्हणायला हरकत नाही. मालिकेत अंतराची भूमिका योगिता चव्हाण साकारते आहे. तिने स्वत: या भूमिकेसाठी रिक्षा कशी चालवायची याचे प्रशिक्षण घेतले. रिक्षा चालवणे शिकले पण खरी गंमत तेव्हा आली जेव्हा मला रिक्षा चालवताना संवाद देखील बोलायचे होते, अॅक्टिंग देखील करायची होती. पण म्हणता म्हणता मालिकेतील अंतरा आणि तिची हमसफर (रिक्षा) यांनी प्रेक्षकांची माने जिंकली. मग तिचा हमसफर सोबतचा संवाद असो व तिचं आणि हमसफर नातं असो. सेटवर अंतराला म्हणजेच योगिताला एकदिवशी सरप्राईझ मिळाले जेव्हा रेखा दुधाणे तिला भेटायला सेटवर आल्या. अंतरा म्हणे माझ्यासाठी तर ती “ग्रेट भेट”चं.

योगिता म्हणाली, “रेखा दुधाणे महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक. त्या अचानक एक दिवस आम्हाला भेटायला जीव माझा गुंतला मालिकेच्या सेटवर आल्या. जेव्हा त्या रूममध्ये आल्या तेव्हा त्यांची dashing personality बघून मला काही शब्दच सुचले नाही. त्यांचा तो खाकी गणवेश आणि चेहर्‍यावर एक वेगळंचं तेज होतं. त्यांनी गोड अशी स्माईल देत, रिक्षाची चावी फिरवत रूममध्ये एंट्री केली. त्यांना समोर बघून अचानक अंतराचं भविष्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. मला माझ्यावर सोपावलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक प्रकार्षाने झाली. पण, या गोष्टीचा आनंदसुध्दा झाला की, मालिकेद्वारे आपण अशा एका personality ला रीप्रेसेंट करतो आहे. आणि जेव्हा त्यांनी अंतराची तारीफ केली तेव्हा मी कसेबसे माझे अश्रु आवरू शकले. त्या रिक्षाचालक नसून त्या नर्सदेखील आहेत. रेखा ताईंनी आयुष्यात मुलगी, बहीण, बायको आणि अश्या अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. गेले तीसहून अधिक वर्ष नर्सिंग बरोबरच रिक्षा चालवून संसाराला चांगलाच हातभार लावत आहेत. मला आशा आहे रेखा ताईंच्या आशीर्वादाने आणि तमाम महाराष्ट्राचं प्रेम या दोन्हीमुळे मी देखील अंतराच्या भूमिकेला न्याय देऊ शकेन”.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive