लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाच काम ठप्प झालं. यात मालिका, सिनेमे, नाटक आणि इतर विविध चित्रीकरणालाही फटका बसला. दररोज विविध भाग शूट करणाऱ्या मालिकांचे चित्रीकरण बंद झाल्याने मालिकांचे जुने भागच प्रसारित करण्यात आले.
‘जिव झाला येडापिसा’ या मालिकेचेही जुने भाग प्रसारित करण्यात आले होते. मात्र लवकरच चित्रीकरण पुर्ववत होत असल्याने ही मालिका आणि मालिकेचे नवे भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शिवा आणि सिध्दीची ही लव्हस्टोरी पुन्हा पाहायला मिळणार आहे. म्हणजेच शिवादेखील पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र त्याच्या येण्यानं प्रेक्षकांपेक्षा जास्त आनंद त्याची आई मंगलताईंना झाला आहे. शिवा येणार म्हटल्यावर त्याला भेटायला ती उत्सुक झाली आहे. नुकताच कलर्स मराठी वाहिनीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात मंगलताई शिवाच्या येण्यानं उत्सुक असल्याचं पाहायला मिळतय. यात असं लिहीलय की, “
शूटिंग बंद झाल्यावर 3 महिन्यांपासून आपला सर्वांचा लाडका शिवा जणू गायबच झाला होता. आता मात्र आपला शिवा दादा जोमात परत आलाय. त्याला भेटायची उत्सुकता जशी तुम्हाला लागली आहे तशी आपल्या मंगलताईंना पण लागली आहे. त्यांचा आनंद किती ओसंडून वाहतोय बघाच.”
तेव्हा प्रेक्षकांची ही आवडती मालिका पुन्हा भेटीला येतेय म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असणार एवढं नक्की.