'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या सेटवर असं सुरु आहे टीम वर्क

By  
on  

 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही नवी मालिका अल्पावधीतच सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. गौरी आणि जयदीप यांची लहापणीची मैत्री आणि त्यानंतर काही वर्षांनंतर मोठं झाल्यावर त्यांच्या आयुष्यात झालेले बदल आणि ते बदल त्यांना पुन्हा एकत्र आणतील का यावर ही मालिका पाहायला मिळतेय. विविध आव्हानं आणि प्रसगांना हे दोघं कसे सामोरे जातात हे या मालिकेत पाहायला मिळतय.

अभिनेत्री माधवी निमकर या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहे. मात्र जसा तिचा ऑनस्क्रिन दरारा तसाच मालिकेच्या सेटवरही ऑफस्क्रिन दरारा पाहायला मिळतोय. माधवीने नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत गौरीच्या भूमिकेतील अभिनेत्री गिरीजा प्रभू माधवीची पाठ चेपून देताना दिसतेय.

 

शिवाय इतर कलाकार मंडळीही एकमेकांच्या पाठ चेपून देताना या व्हिडीओत दिसत आहेत. टीम वर्क असं म्हणत माधवीने हा व्हिडीओ शेयर केला आहे.

या व्हिडीओवरून या कलाकारांची ऑफस्क्रिन मस्ती पाहायाला मिळतेय.

Recommended

Loading...
Share