By  
on  

बबड्याचा हा मॅशअप व्हिडीओ पाहून तुमची हसून हसून पुरेवाट होईल

प्रत्येक आई ही आपल्या मुलांवर नितांत प्रेम करते. त्यांच्या चुका पोटात घालते. पण कधी कधी ह्या अतिप्रेमामुळेच ही मुलं फारच शेफारुन जातात व उध्दट, उर्मट आणि मतलबी बनतात. हेच आसावरीच्या बबड्याच्या बाबतीत झालं आहे. 

लहानपणी बाबा गेले म्हणून कष्ट करुन बबड्याला लहानाचं मोठं करणारी आसावरी नेहमीच त्याच्या चुका पदरात घालते. आईला आपल्या मुलाच्या चुका कधीच दिसत नाही असं म्हणतात,आईच प्रेम हे आधंळ असतं. त्यामुळे बबड्याने मांडलेला मनमानी कारभाराच्या उच्छादाला चाप बसविण्यासाठी शेफ अभिजीत राजे आणि  बबड्याची पत्नी शुभ्राने कंबर कसली खरी पण बबड्या काही त्यांना दाद देईना. त्यामुळे बबड्या उर्फ सोहमची ही बबडेगिरी अग्गंबाई सासूबाई या लोकप्रिय मालिकेत अजूनही यथेच्छ सुरु आहे. 

मालिकेतली बबड्याची ही बबडेगिरी एका मॅशअप व्हिडीओतून नुकतीच समोर आली आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिलात तर खळखळून हसाल यात शंका नाही. 

बबड्याच्या आत्तापर्यंतच्या सर्व अगाध लीलांचा एक ओझरता प्रवास या मॅशअप व्हिडीओत पाहायला मिळतोय. वर त्यात आजोबांचं त्याला कोंबडीच्या म्हणणं या  व्हिडीओत जबरदस्त तडका लावून जातं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive