कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे असं म्हणत ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतोय. पण या आठवड्यातला चला हवा येऊ द्याच्या थुकरटवाडीतील कलाकारांसाठी खास आठवडा आहे. यावेळी कोणी कलाकार नाही तर मंचावर वेगळेच पाहुणे अवतरणार असून एक धम्माल प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
येत्या १४ ते १६ डिसेंबरपर्यंत या कार्यक्रमात राजकीय हास्यकारंजे उडणार आहेत. महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे, भाजपा खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार थुकरटवाडीत येणार आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील ‘पत्रास कारण की..’ हा भाग लोकांना प्रचंड आवडतो.या भागात ‘पोस्टमन काका’ सागर कारंडे ऊसतोड कामगारांच्या समस्या आणि त्यांचं दुःख सांगणारं पत्र सादर करणार आहेत, त्यावर हे राजकारणी कशी प्रतिक्रीया देतात हे पाहणं औत्सुक्याच्ं ठरेल.