By  
on  

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेची शंभरी, टीमने केला जल्लोष

‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरते आहे. या मालिकेतील लतिका आणि अभिची आंबटगोड मैत्री  आणि त्यानंतर अपघातानेच झालेलं त्याचं लग्न असं कथानक आहे. पण वजनदार मुलगी आणि फिटनेस फ्रिक मुलगा एकत्र आल्यावर काय काय घडू शकतं हे मालिकेमुळे प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं. लतिका साकारणारी अक्षया नाईक आणि अभि साकारणारा समीर परांजपे ही जोडी प्रेक्षकांना खुपच भावली. अभिनेत्री मनवा नाईकची निर्मीती असलेल्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने नुकताच 100 भागांचा टप्पा ओलांडला आहे. शंभरी गाठल्याचं सेलिब्रेशन नुकतंच मालिकेच्या सेटवर दणक्यात साजरं झालं. 

 

कलाकार,तंत्रज्ञ आणि मालिकेची निर्माती मनवा नाईकसह संपूर्ण सुंदरा मनामध्ये भरलीच्या टीमने केक कापून 100 भागांचा  जल्लोष साजरा  केला. मालिकेतल्या कलाकारांना सेटवरच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना प्रचंड आनंद होत होता.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive