By  
on  

कुणीतरी येणार येणार गं! जेनीच्या डोहाळे जेवणाचा पार पडला धम्माल कार्यक्रम

'माझ्या नव-याची बायको'  ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीची आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी आपलंसं केलं आहे. मालिकेतील नवनवे ट्विस्ट आणि टर्न्सची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता  असते. राधिका मसालेतील राधिकाची विश्वासू सहकारी आणि आनंद भाऊजींची पत्नी जेनी ही प्रेग्नेंट् असल्याचं कित्येक दिवसांपासून मालिकेत पाहायला मिळतंय. या मालिकेत जेनीचा नुकताच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झोकात पार पडल्याचं या समोर आलेल्या फोटोंमधून दिसतंय. 

राधिका मोठ्या उत्साहात जेनीचं डोहाळे जेवण सोहळा करतेय तर सौमित्र बाळाच्या फोटोमध्ये आनंदचा फोटो लावून तिला खुप चिडवतोय अशी धम्मालसुध्दा पाहायला मिळतेय. लवकरच हा एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive