'आई कुठे काय करते'ची ईशा मालिकेला ठोकणार रामराम?, जाणून घ्या सत्य

By  
on  

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका.  या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून रसिकांच्या प्रचंड आवडीची आहे. या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. मालिकेतलं हसरं-खेळतं कुटुंब सर्वांनाच भावतं. अनिरुध्द-अरुंधतीची तीन मुलं म्हणजेच ईशा, अभिषेक आणि यश यांच्यातलं प्रेम आणि खोडसाळपणा पाहून आपल्याच भावडांचं प्रतिबिंब आपण त्यात पाहतो. 

 

मालिकेतलं शेंडेफळ म्हणजेच ईशाचे ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन प्रचंड लाड होतात. ईशाला मध्यवर्ती ठेऊन अनेकदा या मालिकेचं कथानक गुंफण्यात आल्याचं आपण अनुभवलं. पण आता अल्लड ईशा साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे ह्या मालिकेतून एक्झिट घेणार का अशा चर्चा सुरु आहेत. कारण, नुकतंच अपूर्वाने हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केल्याचं तिच्या सोशल मिडीयावरुन शेअर केलंय .

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva (@apurvagore)

 

लोकप्रिय अभिनेता सुमित राघवन स्टारर 'वागळे की दुनिया' या हिंदी मालिकेत ईशा फेम अपूर्वा झळकतेय. त्यामुळे 'आई कुठे काय करते'मालिकेतून ईशा एक्झिट घेणार की काय..असा समज झाला. परंतु असं अजिबातच नसून अपूर्वाने दोन्ही मालिकांचं शूटींग शेड्यूल व्यवस्थित मॅनेज केलं असून ती मराठी व हिंदी या दोन्ही मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन करणार आहे. 

 

 

 

अपूर्वाला तिच्या दोन्ही मालिकांसाठी पिपींगमून मराठीतर्फे खुप खुप शुभेच्छा. सध्या चाहतेसुध्दा अपूर्वावर तिच्या हिंदी पदार्पणासाठी कौतुकाचा वर्षाव करतायत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony SAB (@sonysab)

Recommended

Loading...
Share