By  
on  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सादर होणार महाप्रहसन, पाहा हा धम्माल व्हिडीओ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये प्रेक्षकांना मंचावर स्त्री गट विरुद्ध पुरुष गट असा क्रिकेटचा लाइव्ह सामना बघता येणार आहे. हास्यजत्राच्या मंचावर पहिल्यांदाच महाप्रहसन सादर होणार आहे. फर्स्ट इनिंग्ज प्रहसनाचा (स्कीटचा) पहिला भाग असेल तर दुसरी इनिंग हा दुसरा भाग असेल. स्त्री विरुद्ध पुरुष क्रिकेटचा सामना अशी संकल्पना विशाखा सुभेदार यांनी सुचवली त्यावर लेखकांच्या टीमनी काम करून हे स्कीट तयार केलं आहे.

सचिन गोस्वामींनी हे स्कीट बसवताना अनेक बारकावे ध्यानात ठेवून ते स्कीटमध्ये घेतले आहेत. सचिन मोटे आणि प्रसाद खांडेकर यांनी लिखाण करताना सर्व बाजू लक्षात घेतल्या आहेत.  प्रेक्षकांना हे महाप्रहसन नक्की आवडणार आहे.  या स्कीटची अजून एक खास गोष्ट म्हणजे या स्कीटमध्ये हास्यजत्रेतील सगळे कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे सर्व लाडके कलाकार एकाच स्कीटमध्ये त्यांना पाहायला मिळणार आहेत. 

 

पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', सोम.-गुरु., रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive