Video : ‘असा’ शूट झाला ‘सांग तू आहेस का’ मालिकेचा तो थरारक स्टंट सीन

By  
on  

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सांग तू आहेस का’ ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. हॉरर जॉनरच्या या मालिकेत रोमांचक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  या मालिकेत लवकरच डॉक्टर वैभवीला स्वराजच्या पत्नीची हत्या झाल्याचं लक्षात येणार आहे. या भागाचा प्रोमो सध्या वाहिनी वर सतत दाखवला जातोय.ॉ. या प्रोमोमध्ये जेव्हा मृत वैभवी ही डॉक्टर वैभवीला स्पर्श करते तेव्हा तिला स्वराजच्या पत्नीचा इमारतीवरून कसा मृत्यू झाला याचं दृशय दिसतं.

या प्रोमोत स्वराजची पत्नी वैभवी इमारतीवरून अनेक फूट खाली स्वराजच्या गाडीवर कोसळताना दिसतेय. मालिकेच्या या थरारक सीनसाठी मालिकेच्या टीमने मोठी मेहनत घेतली आहे. एवढचं नव्हे तर या स्टंटसाठी वैभवीने म्हणजेच अभिनेत्री सानिया चौधरीने मोठं धाडस दाखवत हा स्टंट स्वत: पूर्ण केला आहे. सानियाने या सीनच्या मेकिंगचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. यात सानिया सुरुवातीला प्रचंड घाबरल्याचं दिसत आहे. सानियाला एका क्रेनला बांधण्यात आलं आहे. क्रेनच्या मदतीने सानिया जशी जशी वर जाऊ लागली तशी तिची चांगलीच घाबरगुंडी उडाली. नंतर मात्र मोठं धाडसं दाखवत तिने हा सीन पूर्ण केला.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

हा सीन शूट करण्यासाठी संपूर्ण टीमने मेहनत घेतली. तसंच सर्वप्रथम वैभवी साकारणा-या सानियाला सर्वांनी खुप एन्करेज केलं त्यामुळेच ती हा स्टंट यशस्वीरित्या पूर्ण करु शकली. वैभवीचा चेहरा दिसणं आवश्यक असल्याने कोणताही स्टंटमॅन न वापरता हे दृश्य चित्रित करण्यात आलंय. या सीन यशस्वीपणे शूट झाल्यानंतर सर्वानीच सानियाचं कौतुक केलं. सानियानेसुध्दा ही संधी मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत आणि आपला अनुभव शेअर ेकला आहे. 

Recommended

Loading...
Share