By  
on  

पाहा Video : तिला पाहून फक्त काळजाचा ठोका चुकणार नाही तर...

कोकणात घडणारी रहस्यमय आणि थरारकअशी अण्णा नाईक आणि कुटुंबियांची  गोष्ट रात्रीस खेळ चाले मालिकेतून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचली. या मालिकेचा दुसरा सीझनसुध्दा तुफान लोकप्रिय ठरला. यातली अण्णा नाईक व शेवंताची केमिस्ट्री तुफान गाजली. आता या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काही महिन्यांपूर्वी करोनाच्या दुसऱ्या लाटेत लावल्या गेलेल्या निर्बंधांमुळे अनेक मालिकांच्या चित्रीकरणावर निर्बंध आले. त्यात 'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेचं चित्रीकरण देखील बंद करण्यात आलं. परंतु, आता मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

कोकणची पार्श्वभूमी आणि  'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेत दाखवण्यात येणारी कथा नाईक वाड्याभोवती फिरत असल्याने इतर ठिकाणी चित्रीकरण करणं शक्य नव्हत. इतर मालिका परराज्यात शूटींगसाठी रवाना झाल्या पण ही मालिका मात्र थांबली. 

 

 

'रात्रीस खेळ चाले ३' मालिका येत्या  १६ ऑगस्टपासून रात्री ११ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता मालिकेत कोणकोणते नवे ट्विस्ट दाखवण्यात येणार आणि अण्णा-शेवंताची केमिस्ट्री कशी रंगणार  हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive