By  
on  

'ती परत आलीये' मालिकेत झळकणार ही अभिनेत्री

'ती परत आलीये' या मालिकेचे प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर या मालिकेविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झालीय. त्यामुळे या मालिकेविषयी उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये ज्येष्ठ अभिनेते विजय कदम झळकतायत. मात्र इतर कलाकार कोण झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यातच या मालिकेसाठी एक अभिनेत्रीचं नाव समोर आलय.

अभिनेत्री कुंजिका काळविंट या मालिकेत वेगल्या भूमिकेतून झळकणार आहे. या मालिकेत कुंजिकासोबतच आणखी काही कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. कुंजिकाला थ्रिलर जॉनरची आवड असून त्या जॉनरच्या मालिकेत काम करण्याचा आनंद तिने व्यक्त केलाय. शिवाय विजय कदम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचाही तिला आनंद आहे.

या मालिकेविषयी सांगताना कुंजिका म्हणते की, "यापूर्वी मालिकेत मी खलनायिकेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात मला तशाच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारण्यात येत होतं. एक कलाकार म्हणून मला नव्या भूमिकांचं अवकाश शोधयचं होतं. जिथं मला नवं काही शिकायला मिळेल. ही संधी ‘ती परत आलीये’ या मालिकेच्या निमित्तानं मिळाली. मला स्वतःला थ्रिलर हा प्रकार अधिक आवडतो. त्यामुळे अशा मालिकेत एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे. ही भूमिका आव्हानात्मकदेखील आहे. ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण, हे गूढ उलगडताना पाहणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तसंच या मालिकेमुळे मला ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे." 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive