By  
on  

‘आमच्या पप्पांच्या लग्नाला यायचं हं’, संजना-अनिरुद्धच्या लग्नाची धम्माल पत्रिका

मराठी मालिकाविश्वात 'आई कुठे काय करते' ही मालिका यशोशिखरावर आहे. या कौटुंबिक मालिकेला प्रेक्षकांची खुप पसंती आहे. ह्या मालिकेतील सर्वच पात्र महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. सध्या ह्या मालिकेत रंजक कथानक पाहायला मिळतंय. घटस्फोटानंतर अरुंधती देशमुखांचं घर सोडून आईकडे डोंबिवलीला राहायला गेलीय. तर इथे गुडघ्याला बाशिंग बांधून संजना अनिरुध्दसोबत लग्नाच्या तयारीला लागलीय. कधी एकदा ती अनिरुध्दच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात मिरवतेय आणि देशमुखांच्या घरात येतेय असं तिला झालंय. 

आता अनिरुद्ध लवकरच संजनाशी लग्न करणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर संजना आणि अनिरुद्धच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. ही पत्रिका वाचून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

ही मालिकेतील पत्रिका नसून एका मीम्स तयार करणाऱ्या पेजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. ही पत्रिका शेअर करत त्यांनी ‘आन्या ऑल द बेस्ट’ असे म्हटले आहे.

 

ह्या धम्माल पत्रिकेच्या शेवटी छोट्या निमंत्रकांमध्ये अनिरुद्ध आणि अरुंधतीची मुले ईशा, यश, अभिषेक यांची नावे लिहिण्यात आली आहेत. सध्या सोशल मीडियावर ही पत्रिका तुफान व्हायरल झाली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive