By  
on  

आई कुठे काय करते : अरुंधतीने पुन्हा एकदा संजनाला दिलं सडेतोड उत्तर

छोट्या पडद्यावरची आई कुठे काय करते ही मालिका दिवसेंदिवस रंजक होतेय. या मालिकेच्या प्रत्येक भागाची रसिक प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अरुंधतीच्या शब्दाखातर अनिरुध्दने संजनाशी लग्न केलं खरं, पण यानंतर देशमुखांच्या घरातील शांतता मात्र पार हद्दपार झाली. ते हसतं-खेळतं घर पुरतं कोलमडलं. हेकेखोर संजना माप ओलांडून घरात येत असतानाच आज्जी चक्कर येऊन पडली. तातडीने तिला रुद्णालयात एडमीट करावं लागलं. कांचन आजीला  संजना या घरात नकोच होती. 

कांचन आज्जी रुग्णालयातून बरं होऊन घरी आल्या आहेत, पण त्यांना सक्तीची विश्रांती आणि महत्त्वाचं म्हणजे शांतता  व हसरं-खेळतं वातावरण अपेक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

 

अप्पांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने देशमुखांच्या कुटुंबात राहावं. ती इथे राहिली तर घरात शांतता नांदेल, असा विचार करणाऱ्या अप्पांनी देशमुखांचा ‘समृद्धी’ बंगला आता अनिरुद्ध आणि अरुंधती या दोघांच्याही नावावर केला आहे. अर्थात आता अरुंधती देखील या अर्ध्या घराची मालकीण झाली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा देशमुखांच्याच घरात राहणार असल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

आगामी एपिसोडमध्ये, अरुंधती संजनाला चांगलाच दम देणार आहे. सकाळची काम उरकण्यासाठी अरुंधतीची घाई सुरु असताना. ती अनिरुद्धच्या बेडरूम जवळ येते आणि तेवढ्यात अनिरुद्ध देखील दरवाजा उघडतो. अरुंधतीला पाहून संजना तिला टोचून बोलण्याचा प्रयत्न करते आणि बोलते तू मुद्दाम आमच्या बेडरूमला कान लावून ऐकत होतीस. संजनाला सडेतोड उत्तर देत अरुंधती बोलते की या घरात राहण्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही. अप्पांनी हे घर माझ्यानावावर देखील केलं आहे. आता अरुंधती आणि संजना एका घरात एका छता खाली कशा राहणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive