By  
on  

ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर आणि समाजसेवक मतीन भोसले येणार हॉटसीटवर

सामान्य माणसासाठी सतत झटणाऱ्या आणि त्यांचा आवाज बनणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर आणि समाजसेवक मतीन भोसले हे 18 सप्टेंबर च्या कोण होणार करोडपती कर्मवीर विशेष भागात येणार आहेत.  गेली अनेक वर्षे मेधाताई सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत आणि अशा सामान्य माणसांचा आवाज म्हणून काम करत आहेत.

कर्मवीर विशेष या भागात कोण होणार करोडपती च्या हॉट सीटवर येऊन त्या हा ज्ञानाचा खेळणार आहेत यावेळी त्यांनी आत्तापर्यंत त्यांना आलेले अनुभव आणि हे समाजकार्य करतानाच्या काही आठवणी मंचावर सांगितल्या. कोण होणार करोडपतीचा कर्मवीर विशेष हा भाग या पर्वातला शेवटचा भाग असून 20 सप्टेंबरपासून सोमवार ते गुरुवार असे चार दिवस प्रेक्षकांची लाडकी महाराष्ट्राची हास्यजत्रा रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे नक्की पहा कोण होणार करोडपती कर्मवीर विशेष भाग 18 सप्टेंबर शनिवार रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive