महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'ज्ञानेश्वर माउली' ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडणार आहे.
'ज्ञानेश्वर माउली' ह्या मालिकेचं शीर्षकगीत दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले असून ते या मालिकेचे निर्माताही आहेत. बेला शेंडे आणि अवधूत गांधी-आळंदीकर यांनी हे शीर्षकगीत गायलं आहे आणि देवदत्त मनीषा बाजी यांनी या शीर्षकगीताचं संगीत केलं आहे. हे सुमधुर शीर्षकगीत ऐकताना माउलींच्या दर्शनाची अनुभूती होते.
पाहा शिर्षकगीत