By  
on  

अनुभवा दिव्यत्वाचं दर्शन 'ज्ञानेश्वर माउली'! - २७ सप्टेंबरपासून

महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २०२१ हे ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचं ७२५ वं वर्ष आहे. यानिमित्त प्रेक्षकांना दिव्यत्वाचं दर्शन अनुभवायला मिळणार आहे.

'ज्ञानेश्वर माउली' ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा  उलगडणार आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.

'ज्ञानेश्वर माउली' ह्या मालिकेचं शीर्षकगीत दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले असून ते या मालिकेचे निर्माताही  आहेत. बेला शेंडे आणि अवधूत गांधी-आळंदीकर  यांनी हे शीर्षकगीत गायलं आहे आणि देवदत्त मनीषा बाजी यांनी या शीर्षकगीताचं संगीत केलं आहे. हे सुमधुर शीर्षकगीत ऐकताना माउलींच्या दर्शनाची अनुभूती होते.

ज्ञानेश्वर माउलींच्या चरित्रगाथेतला काही भाग ग्राफिक्सद्वारे चित्रित होणार आहे.

पाहा, 'ज्ञानेश्वर माउली', २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive