By  
on  

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीने केलाय 'सवत माझी लाडकी' मोड ऑन

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. प्रेक्षक या मालिकेवर जितकं प्रेम करतात, तितकंच काही चुकीचं असलं की त्यावर बिनधास्त व्यक्त होतात. सध्या सुरू असलेल्या ट्रॅक नुसार अरुंधती आणि संजना एकाच घरात राहात असून अरुंधती संजनाला प्रत्येक गोष्टीत मदत करताना दिसत आहे.

अरुंधती ही मालिकेची नायिका सर्वांचीच लाडकी आहे. पण तिच्या दयाळू आणि अति प्रेमळ स्वभावाला आता प्रेक्षक कंटाळले आहेत. मालिकेत संजना वेळोवेळी अरुंधतीचा अपमान करत असूनही अरुंधती संजनाला मदत करताना दिसते. खऱ्या आयुष्यात कोणीही इतके समजूतदार नसते आणि म्हणून या कथानकाचा प्रेक्षक विरोध करताना दिसत आहेत. आई कुठे काय करते या मालिकेच्या नवीन प्रोमो नुसार येणाऱ्या भागात संजनाला नोकरी परत मिळवण्यासाठी तिचा बॉस कॉम्प्रोमाइज करायला सांगतो. आता अरुंधती याबाबतीतही संजनाची मदत करताना दिसणार आहे. घरातील सर्व एकत्र येऊन संजनाच्या बॉसशी लढताना पाहायला मिळतील. परंतु मालिकेतला हा ट्रॅक प्रेक्षकांच्या मात्र पचनी पडलेला नसून त्यांनी मालिकेवर उघड मत व्यक्त केल ंआहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

 

'नक्की आम्ही बघणारे वेडे की दाखवणारे वेडे',  'डोंबिवली मध्ये माता अरुंधतीचं मंदिर उभे करणार', 'मला नाही पटत अरु ताईचं', 'सवत माझी लाडकी', 'अरे कुठे नेऊन ठेवली ही सिरीयल काही logic' अशाप्रकारे सोशल मीडियावर नेटकरी या मालिकेच्या कथानकाची चेष्टा करताना दिसले आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive