By  
on  

देशमुखांच्या घरात लवकरच वाजणार सनई-चौघडे, अनघाचा मंगळसूत्राताील लुक व्हायरल

मराठी टेलिव्हिजनवर आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. टीआरपीच्या रेसमध्ये ही मालिका नेहमीच अव्वल ठरते. आता अनिरुध्द आणि संजना यांच्या लग्नानंतर देशमुखांच्या घरात लवकरच सनईन चौघडे वाजणार आहेत. अभिषेक आणि अनघाने एकमेकांवरचं प्रेम कबूल केलं असून लवकरच ते लग्नबंधदनात अडकतायत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अभी आणि अनघा यांच्या साखरपुड्याच्या दिवशी अंकिता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे दबावाखाली येऊन अभिषेक अंकितासोबत लग्न करतो. परंतु, सत्य उघडकीस आल्यावर मात्र अभिषेक अंकिताला घरातून बाहेर काढतो. त्यानंतर पुन्हा अभिषेक अनघाला एक संधी देण्याची विनंती करतो. अनघादेखील झालं गेलं विसरून अभिषेक सोबत संसार थाटण्याची स्वप्न पाहत आहे. अरुंधतीने त्यांचा निर्णय घरातल्यांना सांगितल्यामुळे सध्या देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. लवकरच अभि आणि अनघाचं लग्नदेखील मालिकेत पाहायला मिळणार असे संकेत आहेत. 

 

अभि-अनघाच्या लग्नाचं स्वप्न पाहणा-या अरुंधतीची इच्छा लवकरच पूर्ण होतेय. म्हणूनच मालिकेत स्वप्नात अरुंधतीने मंगळसूत्र घातलेली नवी नवरी अनघाला पाहिलंय. अनघाचा हा साडी आणि मंगळसूत्रातला लुक व्हायरल होतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive