आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे.
जिजी आक्कांशी किर्तीच्या स्वप्नांसाठी शुभमने यशस्वी लढा दिला आहे. आता तिचं आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न शुभम पूर्ण करणार आहे. त्याने तसा निश्चयच केला आहे.
किर्तीची आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरु असतानाच मध्ये एक अडथळा निर्माण होतोय. अंधश्रध्दा व त्या नावाखाली आपली दहशत निर्माण करणारे
अवतार स्वरुप येतात. अवतार स्वरूपांच्या येण्याने कीर्तीचे स्वप्न पूर्ण होण्यामध्ये येणार का अडचणी...? हे औत्सुक्याचं ठरणार आहे.