छोटा पडदा म्हटलं की इथे, सर्व टीआरपीचा खेळ चालतो. एखादी मालिका किंवा कार्यक्रम मोठा गाजावाजा करत छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पण त्यांच्या यशाची आणि तग धरुन राहण्याची दोरी ही प्रेक्षकांच्याच हातात असते. प्रेक्षकांना तो कार्यक्रम आवडला तर तो तीन-चार वर्षही चालतो, पण नाही पटला तर त्याला दोन-तीन महिन्यातच गाशा गुंडाळावा लागतो. काही मालिका रटाळ आणि कंटाळवाण्या आहेत, तर काहींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सध्या मालिकांचा आठवड्यांचा टीआरपी समोर आला आहे.
प्रेक्षकांची सर्वांत लाडकी मालिका आई कुठे काय करते ही सातत्याने टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल होती, पण आता ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुस-या क्रमांवर फेकली गेली आहे. आई कुठे काय करते ह्या मालिकेच्या जागी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
md'ej
मुलगी झाली हो ही स्टार प्रवाहवरची मालिका तिस-या क्रमांकावर आहे, चौथ्या क्रमांकावर रंग माझा वेगळा ही मालिका आहे. तर पाचवं स्थान फुलाला सुगंध मातीचा ह्या मालिकेने पटकावला आहे.
माझी तुझी रेशीमगाठ, ठिपक्याची रांगोळी ह्या मालिका अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. तर बिग बॉस मराठी तीन या रिएलिटी शोने टीआरपीच्या यादीत नववं स्थान पटकावलं आहे. तर दहाव्या स्थानावर येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आहे.