By  
on  

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर मुंबईची श्वेता दांडेकर इतर स्पर्धकांना देतेय काटे की टक्कर!

सोनी मराठी वाहिनी वरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ' इंडियन आयडल मराठी ' हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरु झाली आहे. महाराष्ट्राला टॉप ८ स्पर्धक मिळाले असून विजेतेपद कोणच्या पदरी पडणार याची उत्कंठा आता वाढते आहे. अजय-अतुल सारखी लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे. ऑडिशन राउंडला शाळेच्या गणवेशात, दोन वेण्या घालून गाणं सादर करण्यासाठी आलेली मुलगी म्हणजे मुंबईची श्वेता दांडेकर. श्वेताचा स्वभाव आणि तिने आतापर्यंत निवडलेली गाणी बघता तिचं 'डॅशिंग दांडेकर' हे नाव अगदी चपखल बसतं. 

  श्वेताने पुरुषाच्या आवाजात गाणं सादर करून गोल्डन माईक मिळवून 'इंडियन आयडल मराठी' च्या टॉप १४ मध्ये स्वतःचं स्थान निश्चित केलं होत. पुरुषी आवाजतलं गाणं असो, भारूड असो किंवा एखादं आयटम सॉंग असो या गाण्यांना पूर्णपणे न्याय देणं, परीक्षकांच्या अपेक्षांना खरं उतरणं हे जबाबदारीच काम श्वेता अगदी चोख पार पाडते आहे.  'काठीनं घोंगडं', 'हरी ओम हरी', 'येना साजणा', भारूड, लावणी, गोंधळ अशा विविध ढंगाची गाणी या सुरांच्या मंचावर श्वेताने सादर करत, अनेक वेळा परीक्षकांकडून 'झिंगाट परफॉर्मन्स' ही मिळवला आहे. गाणं कोणतंही असो, ते उत्तम गाण्याची शैली, रियाजातलं सातत्य आणि मेहनत करण्याची तयारी या गुणविशेषांमुळे मुंबईची ही मुलगी रसिकांचं मन जिंकण्यातही यशस्वी ठरते आहे. शाळेत जाणारी श्वेता जेव्हा गाऊ लागते तेव्हा एखादी पार्श्वगायिका गाते असं वाटतं. ऑडिशन राउंड ते आतापर्यंत श्वेताने विविध प्रकारची गायलेली गाणी, तिने केलेला प्रयत्न आणि त्याला मिळालेली परीक्षकांची कौतुकाची पावती, हे सगळं अभिमानास्पद आहे. 

  टॉप ८ मध्ये स्थान मिळवलेली श्वेता विजेपदासाठी कशी मेहनत घेते, कोणकोणती गाणी ऐकवते हे जाणून घेण्यासाठी पाहा, फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'इंडियन आयडल मराठी', सोम.-बुध.,रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive