By  
on  

या मालिकेशी होतेय 'आई कुठे काय करते'ची तुलना, पुन्हा तेच कथानक

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेत अनेक नवनवी वळणं येत आहेत. देशमुखांचं घर सोडल्यानंतर आता अरुंधती आशुतोषच्या साथीने आप्या पायावर उभी राहतेय. तिची स्वप्न पूर्ण करतेय. ख-या अर्थाने स्वतंत्र होतेय. या मालिकेची सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चा सुरू असते. पण अनेकदा मालिकेला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केलं आहे.

प्रेक्षक आणि नेटकरी मालिकेतील चांगल्या गोष्टींचं कौतुकही करतात. पण काहीच्या चुकीच्या गोष्टी असतील तर त्यावरही आपलं मत नोंदवतात. सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेबद्दल प्रेक्षकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. या मालिकेची तुलना नेटकऱ्यांनी काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या निरोप घेतलेल्या 'माझ्या नवऱ्याची बायको' शी केली आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. दोन्ही मालिकांची कथा एकाच ट्रॅकवर सुरू असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. वेगळं काही नाही, जे 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत तेच पाहायला मिळतंय, असं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलीए.

माझ्या नव-याची बायको मालिकेच राधिका आदी गृहिणी होती मग मोठी उद्योजिका बनली आणि तिनेसुध्दा नवा संसार थाटला. तर आई कुठे काय करते ही मालिकासुध्दा आता याच मार्गावर सुरु आहे. अरुंधती आधी गृहिणी होती आता आशुतोषच्या येण्याने ती मोठी गायिका तर होतेच आहे, पण हळूहळू त्याच्या प्रेमातही ती पडतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive