By  
on  

Video : ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेची शंभरी, पाहा नवं शिर्षकगीत

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्‍या जाज्वल्य इतिहासाचे, अपरिचित पर्व उलगडणार्‍या सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेन अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले असून नुकताच या मालिकेने शभर भागांचा टप्पा ओलांडला आहे. 
या निमित्ताने मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने खास आनंदसोहळा साजरा केला आणि बरोबरीने मालिकेच्या ऐतिहासिक महत्वाला प्राधान्य देऊन दोन महत्वाच्या गोष्टी डिजिटल माध्यमांवर प्रकाशित करण्यात आल्या. 

मालिकेच्या सेटवर नित्यनियमाने दिली जाणारी छत्रपती शिवाजी महाराजांची गारद आणि आतापर्यंत महाराणी ताराराणींचे मालिकेत चित्रित झालेले चित्तवेधक, वीरश्रीयुक्त प्रसंगांचा समावेश असलेले शीर्षकगीत प्रकाशित करण्यात आले. 

दोन्ही ऐतिहासिक महत्वाच्या जाज्वल्य अभिमान जागृत करणार्‍या गोष्टींना रसिक प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर दररोज संध्याकाळी ७:३० वा. आवर्जून पाहिली जाते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive