By  
on  

रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा – रंगणार कलर्स मराठी अवॉर्ड २०२१ – २२

 मनोरंजनाच्या वारीत वर्षभर कंबर कसून प्रेक्षकांच्या सेवेत त्यांची करमणूक करण्यासाठी अनेक कलाकार सज्ज असतात, मग ते पडद्यामागील असो वा पडद्यावर दिसणारे. मागील दोन वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होती, या सगळ्या त्रासात रसिकांना त्यांच्या दु:खाचा, अडचणींचा विसर पडला तो म्हणजे रात्रंदिवस कष्ट करून मालिकांच्या वा कार्यक्रमांच्या शूटमध्ये असलेल्या आपल्या लाडक्या कलाकार आणि पडद्यामागील संपूर्ण टीममुळे. त्यांना हे श्रेय नक्कीच द्यायला हवं... आणि म्हणूनच संपूर्ण वर्ष या घराला घरपण ज्यांनी दिले त्यांचे कौतुक करण्यासाठी कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे “रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा – कलर्स मराठी अवॉर्ड २०२१ – २२”

मागील वर्षी आपल्या सगळ्यांवर ओढवलेल्या संकटात देखील रसिक प्रेक्षकांनी कलर्स मराठीवरील त्यांच्या आवडत्या मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखांवर जीवापाड प्रेम केले. मग ती जीव माझा गुंतला असो वा तुझ्या रूपाचं चांदन ही मालिका असो वा बिग बॉस मराठी असो. मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले.

या कठीण परिस्थितीत देखील कलर्स मराठी कुटुंबाबरोबरचं नातं रसिकांनी अबाधित राखलं. कलर्स मराठीवरील आपल्या आवडत्या कलाकारांचा गौरव करणारा हा आपल्या हक्काचा सोहळा संपन्न होणार आहे. पाठीवर असू द्या आपुलकीचा हात करत आहोत नवी सुरुवात... तेव्हा नक्की बघा “कलर्स मराठी अवॉर्ड २०२१ – २२” २७ मार्च रोजी दुपारी १२ आणि संध्या ७.०० वा. लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर.

 

कलर्स मराठी अवॉर्डची घोषणा झाल्यापासूनच कोणत्या मालिकेला कोणते अवॉर्ड मिळतील, कोण महाराष्ट्राची लाडकी सून कोण ठरणार ? कोण ठरणार लोकप्रिय नायक - नायिका ? कोण ठरले लोकप्रिय कुटुंब, कोणती जोडी ठरली लोकप्रिय जोडी ? कोणत्या मालिकेने पटकावले लोकप्रिय मालिकेचे अवॉर्ड? या सगळ्याच विभागांच्या स्पर्धेत चांगलीच चुरस रंगली बघायला मिळाली.

आता नक्की कोणाला अवॉर्ड मिळाले याची उत्सुकता रसिकांना लागून राहिलीय. विविध पुरस्कारांबरोबरच लॉकडाऊननंतर मनोरंजन क्षेत्राला पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

अशा विविध पुरस्कारांबरोबरच दिलखेचक नृत्ये, धमाल स्कीट्सची मेजवानी सोहळ्यात रसिकांना बघायला मिळणार आहे. आपल्या सगळ्यांचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता सुमित राघवन आणि हरहुन्नरी कलाकार स्पृहा जोशी या सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन करणार आहेत. 

 

या दिमाखदार सोहळ्यात प्रेक्षकांचे मनोरंजन आणि नात्यांमधील क्षण रंगतदार होणार आहेच पण प्रेक्षकांना एक खास सरप्राईझ देखील मिळणार आहे. आता हे सरप्राईझ काय असेल ? जाणून घेण्यासाठी बघा रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा – कलर्स मराठी अवॉर्ड २०२१ -२२ - २७ मार्च दुपारी १२ आणि संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive