'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर 'धर्मवीर'च्या टीमसोबत येणार एकनाथ शिंदे!

By  
on  

पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता हास्यपंचमी साजरी करतो आहे. आठवड्यातले पाचही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळतो आहे. यंदाच्या आठवड्यात म्हणजेच १६ आणि १७ मे रोजी रसिकांचं मनोरंजन वाढणार आहे. कारण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर येणार आहेत खुद्द केबिनेट मंत्री एकनाथ शिंदे. अनेक सभांमधून, भाषणांतून जनतेची मनं जिंकणारे एकनाथजी निखळ मनोरंजनाचा खास आस्वाद घ्यायला येणार आहेत.

एकनाथजी यांच्यासोबत त्यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदेसुद्धा येणार असून, हास्याच्या मंचावर हे दिग्ग्ज खळखळून हसणार आहेत. आम्हांला हा कार्यक्रम खूप आवडतो असं त्यांनी कार्यक्रमात सांगितलं. अभिनेता प्रसाद ओक याचा 'धर्मवीर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. लेखक प्रवीण तरडे यांच्या लिखाणाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका जुन्या आणि लोकप्रिय राजकीय नेत्याची कारकिर्द सांगणार आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माता प्रवीण तरडे, अभिनेता मंगेश देसाई, क्षितीश दाते आणि अभिनेत्री श्रुती मराठे हे कलाकार हास्याच्या मंचावर येणार आहेत.

या चित्रपटाची सगळीकडेच खूप चर्चा आहे. अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाचा टीम चमू हास्याच्या मंचावर येणार आहे. हास्यरसिकांसाठी ही पर्वणी ठरेल. 
 

Recommended

Loading...
Share