अखेर 'देवमाणूस'चा होणार शेवट? ; मालिका रोमांचक वळणावर

By  
on  

झी मराठी वरील 'देवमाणूस' या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग देखील आला. मात्र 'देवमाणूस-२' मालिका प्रेक्षकांच्या इतकी पसंतीस पडली नाही. मालिकेत सारखे ट्विस्ट आणून मालिका आणखी रंजक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आता मात्र अजितकुमारचा खेळ खल्लास होणार असून देवमाणूस लवकरच पोलिसांच्या तावडीत सापडणार आहे.

'देवमाणूस-२' मालिका शेवटच्या वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेचा शेवट अजितकुमारला अटक होऊन होणार असल्याचं दिसतंय. नुकताच देवमाणूसच्या इंस्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. त्या फोटोमध्ये अजितला अटक होऊन तो खाली बसलेला दिसत आहे. तर त्यासोबत मागे इन्स्पेक्टर जामकर आणि इतर पोलीस उभे राहिलेले दिसत आहेत. या फोटोमुळे चाहत्यांमध्ये अजित कसा पकडला जाणार याबद्दल प्रचंड उत्कंठा वाढली आहे.

Recommended

Loading...
Share