By  
on  

'अनिरुद्ध बोलायला लागला की माझं सुद्धा डोकं भंणभंण करायला.....' मिलिंद गवळींची पोस्ट

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. गेली कित्येक वर्ष ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेत आपल्या मनमानी आणि उध्दट वागण्यामुळे प्रेक्षकांच्या डोक्यात जाणारी व्यक्तिरेखा म्हणजे अनिरुध्द देशमुख. नेहमीच मालिकेची नायिका म्हणजेच त्याची पत्नी अरुंधती देशमुखला पाण्यात पाहणारा, सतत तिला हिणवणारा, घालून-पाडून बोलणारा अनिरुध्द देशमुख प्रेक्षकांच्या टीकेचा धनी होतो. आता तर अरुंधतीने आशुतोष बरोबर लग्नाचा निर्णय घेतल्याने तो आणखीनच चवताळलाय. तिला नको-नको ते बोलतोय. अभिनेता मिलिंद गवळी हे या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारत आहेत. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकतंच मिलिंद गवळींनी या मालिकेबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मिडीयावर मिलिंद गवळी हे नेहमीच व्यक्त होत असतात. आता त्यांनी अनिरुध्द देशमुख बाबत एक पोस्ट लिहत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमधल्या व्हिडीओमध्ये अनिरुध्द अरंधतीवर भरपूर चिडलेला पाहायला मिळतोय. 

 

जाणून घ्या मिलिंद गवळींची पोस्ट 

 

“अनिरुद्ध अरे थांब जरा थांब , किती बोलतोयस”
खरंच अनिरुद्ध सारखी माणसं किती बोलतात आणि काय काय बोलतात ,किती मनाला लागेल असं बोलतात ,कशाचाच भान ठेवत नाही ,समोरच्याला काय वाटेल? त्याला किती त्रास होईल ? त्याचं मन किती आपण दुखवतो आहोत , याचं कसलंच भान नाही या माणसाला, मग अशा माणसाची चीड नाही येणार का.?

बर्याच वेळेला तर मला सुद्धा त्याची चीड येते. अनिरुद्ध बोलायला लागला की माझं सुद्धा डोकं भंणभंण करायला लागतात, कधी तर तो इतकं विचित्र बोलतो की मला असं वाटतं की माझं डोकं फुटेल कि काय. पण त्याला बोलावंच लागतं ,तो बोलला नाही तर, कसं व्हायचं?

काळ्या रंगाचा ब्लॅकबोर्ड असला तरच तर त्यावर पांढरी अक्षर उमटून दिसतील ना. हा अनिरुद्ध तो ब्लॅकबोर्ड आहे. बरं नमिता आणि मुग्धाने लिहिलेलं आम्हा सगळ्यांना बोलावच लागतं , न बोलून सांगतात कोणाला! बरं हा अनिरुद्ध पहिल्या एपिसोड पासूनच असाच आहे,

पहिल्या एपिसोड मध्ये अरुंधतीला घराच्या बाहेर काढलं होतं त्याने आणि आता सुद्धा तेच करतोय. सांगायचा मुद्दा काय आहे की , त्यांनी ही बडबड केल्यानंतर जे काय डोक्याचा भुगा होतो , तो कसा निस्तारायचा, तर शांत बसायचं. Meditation करायचं, पूर्वी बरं होतं , एक खूप शांत मांजर आमच्या सेटवर होती, खूपच मायाळू आणि प्रेमळ होती, तिच्याबरोबर मला खूप शांत वाटायचं , छान वाटायचं, ति जवळ येऊनच बसायची, तिच्या बरोबर माझं डोकं शांत व्हायचं

पण काय सगळ्यांना कुत्रे ,मांजरी ,पक्षी ,प्राणी आवडत नाहीत. त्यांच्यापैकी एक एक जण तिला लांब कुठेतरी सोडून आला, का तर शूटिंगच्या मध्ये मध्ये यायची म्हणून, त्यांना disturb व्हायचं.

These are the realities of life…पण मग हल्ली अनिरुद्ध खूपच डोक्यात जातो आणि बाहेर यायचं नावच घेत नाही”, असे मिलिंद गवळींनी या पोस्टमध्ये म्हटले.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive