By  
on  

अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात चांगले-वाईट प्रसंग येत असतात. या प्रसंगाचा खंबीरपणे सामना करत आयुष्याकडे नव्या दृष्टीने पहायला हवं हा मोलाचा संदेश देणाऱ्या अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १२ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. अनन्या ही मध्यमर्गीय कुटुंबातील मुलगी. अतिशय हुशार आणि आयुष्यावर भरभरुन प्रेम करणारी. मात्र अनन्याचं हसतं खेळतं आयुष्य एका अपघाताने पुरतं बदलून जातं. तिला तिचे हात गमवावे लागतात. आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव गमावल्यानंतरही खचून न जाता या परिस्थितीशी अनन्या कसा संघर्ष करते याची प्रेरणादायी गोष्ट सिनेमातून उलगडेल. लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळेने अनन्या साकारली असून अमेय वाघ, चेतन चिटणीस, ऋचा आपटे, योगेश सोमण, सुव्रत जोशी हे कलाकारही सिनेमात लक्षवेधी भूमिकेत आहेत. सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केलं आहे.

पदार्पणातच प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, कारखानिसांची वारी, दगडी चाळ २, सरसेनापती हंबीरराव अश्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर पाहायला विसरु नका अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार १२ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता फक्त प्रवाह पिक्चरवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive