By  
on  

Video : सोनी टीव्हीच्या माफीनाम्यानंतर केबीसीच्या सेटवर पोलिस सुरक्षा तैनात

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर वादात सापडलेला कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम आणि सोनी वाहिनी यांनी शनिवारी आपला माफीनामा सोशल मिडीयावर जाहीर केला. महानायक अमिताभ बच्चन यांनीसुध्दा या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 'शिवरायांचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही,' असं अमिताभ यांनी म्हटलं आहे.  पण तरीसुध्दा या  माफीनाम्यानंतर सेटवर तोडफोड आणि दंगसीसारखे प्रकार घडू नयेत म्हणून पोलिस सुरक्षा तैनात करण्यात आली होती. याचा एक व्हिडीओसुध्दा नुकताच समोर आला आहे. 

 

सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोनी टीव्ही आणि शोचा नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला . याविरोधात सोनी चॅनेलवर बहिष्कार घालण्यासाठी #Boycott_KBC_SonyTv  हा हॅशटॅग़ ट्रेंड होत होता. मराठी सेलिब्रिटींसह अनेकांनी सोनी आणि केबीसीचा निषेध केला. वाढता दबाव पाहून सोनीने ट्वीट करत माफी मागितली.  

 

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला एकेरी उल्लेख ही आमच्याकडून अनावधानाने झाली चुक आहे. त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करत आहोत. प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेता आम्ही कालच्या (गुरुवार)च्या एपिसोडमध्ये आम्ही माफी प्रदर्शन करणारा स्क्रोलही चालवला होता.’

 

Recommended

PeepingMoon Exclusive