शिव ठाकरे आणि वीणा जगतापला मिळाली ही गुड न्यूज

By  
on  

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात सगळ्यात चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी. बिग बॉसच्या घरात यांचं प्रेम जुळलं आणि आता त्यांची हीच केमिस्ट्री आत्तापर्यंत पाहायला मिळतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️Gabri & Gabru ️ @veenie.j

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

नुकतच महाराष्ट्र टाईम्सने मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात आकर्षक महिलांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत महिलांमध्ये वीणा जगतापने बाजी मारली आहे. वीणा जगताप ही मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात आकर्षक महिला ठरलीय. तर नुकतीच मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात आकर्षक पुरुषांची यादीही जाहीर करण्यात आली. आणि यात मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात आकर्षक पुरुष म्हणून शिव ठाकरेचं नाव घोषीत करण्यात आलयं. त्यामुळे या मेड फॉर इच अदर जोडीला या वर्षी मिळाली आहे ही गुड न्यूज. कारण या यादीत दोघांनीही नंबर वन पोझिशन मिळवली आहे.

वीणाचं या यादीत पहिल्या क्रमांकाचं नाव घोषीत होताच शिवने वीणासाठी खास सरप्राईजही प्लॅन केलं. आणि तिला सरप्राईज देतानाचा व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️️ @shivthakare9

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap (@veenie.j) on

सोशल मिडीयावर शिव आणि वीणाचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वापासून रिलेशनमध्ये असलेलं हे कपल लग्नबंधनात कधी अडकणार याचीच चाहत्यांना उत्सुकता आहे. 

   

Recommended

Loading...
Share