By  
on  

खुशखबर! दुरदर्शनवर पुन्हा रामायण, पुन्हा रस्ते ओस पडावेत हीच इच्छा

तुम्हाला आठवतंय ती रविवारची सकाळ जेव्हा सर्वांच्या घरी फक्त आधी रामायण व त्यानंतर महाभारत सुरु व्हायचं, आपण टीव्हीसमोरुन हलायचंच नाही असंच ठरवून टाकायचे सर्वजण.रस्त्यांवरही त्या वेळेत अगदी शुकशुकाट असायचा. किती छान दिवस होते. पौराणिक कथा त्यांचं सार त्यांचा अर्थ नव्या पिढीकडे या मालिकांमुळे पोहचवला जायचा. मोठेही हे कार्यक्रमआनंदाने व उत्साहाने पाहायचे. आता पुन्हा एकदा ती रामायण मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे. 

आता करोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आहे. पंतप्रधान मोदींनी सुध्दा संपूर्ण देश तब्बल २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे घरात राहा, सुरक्षित राहा हा मार्ग अवलंबण्यापलिकडे आपण काहीच करु शकत नाही. कोणी वाचन करतंय तर कोणी घरकामात बिझी आहे, अनेकांनी वेळ घालवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार केला आहे. पण याच दरम्यान अनेकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणा-या दूरदर्शनवरील 'रामायण' व 'महाभारत' या पौराणिक मालिका पुन्हा सुरु कराव्यात अशा मागण्यांचा जोर वाढवला . या सर्वांच्या मागणीला केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय दिला आहे. 

प्रकाश जावडे यांनी ट्विट करत शनिवारपासून रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येणार असल्याची माहिती दिली. ‘मला सांगताना आनंद होत आहे की, लोकांच्या मागणीनुसार, आम्ही रामायण ही लोकप्रिय मालिका शनिवार, २८ मार्च रोजी डीडी नॅशनल या चॅलेनलवर टेलिकास्ट करणार आहोत. दररोज सकाळी ९ ते १० आणि पुन्हा रात्री ९ ते १० या वेळेत रोज एक एपिसोड प्रसारित होईल.असे त्यांनी ट्विट केले आहे. 

प्रसार भारतीचे मुख्य अधिकारी शशी शेखर प्रेक्षकांच्या या मागणीवर विचार करत असल्याचे पाहायला मिळाले. व त्यांच्या प्रयत्नांना यशही आले, आता घरबसल्या पुन्हा एकदा या पौराणिक मालिकेचा आस्वाद घेण्यासारखं दुसरं सुख नाही. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive