करोनाला रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहे. या काळात सोशल मीडियावर लोकांकडून ८०च्या दशकातील रामानंद सागर यांची लोकप्रिय रामायण मालिका सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्या मागणीनुसार २८ मार्चपासून सकाळी ९ आणि रात्री ९ असे दिवसातून दोन वेळा रामायणचे प्रसारण सुरु झाले. महत्त्वाचं म्हणजे ही मालिका ऑन एअर होताच तिने टीआरपीचे सर्व उच्चांक मोडले आहेत.
रामायण मालिकेच्या टीआरपी रेटिंगबद्दल डीडी नॅशनल चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शशी शेखर यांनी ही माहिती ट्विट करुन दिली.
Thrilled to share that the re-telecast of RAMAYAN on @ddnational has garnered the highest ever rating for a Hindi GEC show since 2015 ( source: @BARCIndia )
— Shashi Shekhar (@shashidigital) April 2, 2020