रामायण ही ९० च्या दशकांतील गाजलेली पौराणिक मालिका लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा दूरदर्शनवरुन रसिकांच्या भेटीला आली आणि लेकप्रियतेचे सारे उच्चांक तिने पुन्हा मोडले. त्या काळी ही मालिका सुरु असताना रस्त्यांवर शुकशुकाट असायचा, सर्वकाही ओस पडायचं. आताही या मालिकेने हिंदी मालिका प्रक्षेपणांमध्ये हायेस्ट टीआरपीची बाजी मारल्यानंतर आता एक जागतिक विक्रम रचला आहे.
रामायण या लोकप्रिय पौराणिक मालिकेने जगातील सर्वाधिक पसंतीच्या Game Of Thrones या वेबसिरीजचे सर्व रेकॉर्डस मोडले आहेत. जगात सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ही आता रामायण ठरली आहे. दूरदर्शनने या रेकॉर्डची माहिती आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन दिली आहे.
'गेम ऑफ थ्रोन्स' हा आत्तापर्यंत सर्वाधिक पाहिला गेलेला शो होता. परंतु रामायण सुरु झाल्यावर त्याने या शोला धोबीपछाड केलं. ७७ मिलीयन लोकांनी ही पौराणिक मालिका पाहिल्याने हा विक्रम रचला गेला.
Thanks to all our viewers!!#RAMAYAN - WORLD RECORD!!
Highest Viewed Entertainment Program Globally.#IndiaFightsCorona#IndiaFightsBack pic.twitter.com/Z2WrxtYDEa— Doordarshan National (@DDNational) May 1, 2020