सद्या करोना संकटामुळे जवळपास दोन महिने सर्वच उद्योगधंद्यांसह सिने-नाट्य व मालिका विश्वही बंद आहे. त्यामुळे आता लवकरच ही सर्व बंद पाडलेली गाडी रुळावर आणण्यासाठी सर्वांचे घरातून कसोशिने प्रयत्न सुरु आहेत. अनेक सिनेबॉडीज करोनासंकटानंतरच्या शुटींगसाठी नव्या सुरक्षेच्या गाईडलाईन्स तयार करतायत, पण दरम्यान फेडरेशन ऑफ़ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉय (FWICE) यांनी रोजंदारीवर काम करणा-या कर्मचा-यांच्या सुरक्षेवर प्रकाशझोत टाकला आहे.
FWICE नुसार एखादया रोजंदारीवरील कर्मचा-याचा जर करोनामुळे मृत्यू झाला तर चॅनेल व शोचे प्रोड्युसर यांना ५० लाखांची भरपाई द्यावी लागणार आहे. याबाबतआणखी ठोस निर्णय हे व्हर्च्युअल म्हणजेच स्काईप किंवा झूम मिटींगव्दारे सर्वानुमते घेण्यात येतील. तसच अपघातासाठी व कर्मचा-यांच्या वैद्यकीय उपचारांसाठीसुध्दा अशाच प्रकारची नियमावली तयार करण्यात येत आहे.
टेलिव्हिजन इंडस्ट्री ही पुन्हा आपलं काम मर्यादित कर्मचा-यांसह सुरु करणार आहे. भाभीजी घर पर है आणि एकता कपूरच्या काही मालिका यांचे शूटींग सुरु होणार आहे.