By  
on  

'रामायण'च्या मराठी चाहत्यांसाठी खुशखबर, मराठीत येणार रामायण 

लॉकडाउनच्या काळात रामायण ही प्रसिद्ध मालिका जगभरात पाहिला गेलेला नंबर वन शो ठरला. लॉकडाउन सुरु झाल्यानंतर डीडीवर हा शो पुन्हा प्रसारित केला गेला. आणि प्रेक्षकांनी या मालिकेवर आधीपेक्षाही जास्त प्रेमाचा वर्षाव केल्या. त्यानंतर आणखी एका हिंदी वाहिनीवर हा शो आता प्रसारित केला गेला आहे. मात्र रामायणच्या मराठी चाहत्यांसाठी आता आहे एक खुशखबर आहे. कारण रामायण हा शो आता चक्क मराठी भाषेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर हा शो मराठीत येणार असल्याचं बोललं जातय. मात्र याविषयीची कोणतीही घोषणा या वाहिनीकडून अद्याप आलेली नाही.


मात्र हा शो मराठी भाषेत येत असल्याने राम, सीता, लक्ष्मण, हनुमान या विविध पात्रांचे मराठीतील संवात ऐकणं ते पाहणं रंजक ठरेल एवढं नक्की. मराठी भाषीय प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असेल. 
मात्र याविषयी आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे या मालिकेचं मराठीतील डबिंग हे आधीच झालेलं आहे. ही मालिका हिंदीत चित्रीत करण्यात आली होती. मात्र रामानंद सागर यांनी या मालिकेचं मराठी भाषेतही डबिंग करुन ठेवलं होतं. मात्र मराठीतील रामायण कोणत्याच वाहिनीवर प्रसारित झालेलं नाही. आणि आता इतक्या वर्षांनंतर मराठीत डबिंग झालेलं रामायण प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या जून महिन्यात रामायणचं मराठी भाषेतील भाग प्रसारित होणार असल्याचं बोललं जातय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive