या मालिका कलाकारांनी वडिल आणि बहीण-भावासोबत खेळला हा धमाल खेळ

By  
on  

लॉकडाउनच्या काळात सध्या मनोरंजन चित्रीकरण बंद आहे. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र सध्या मालिका विश्वातील कलाकारही घरीच आहेत. या निमित्ताने ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत.कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका कलाकारांनी फादर्स डेच्या निममित्ताने एक धमाल खेळ खेळला आहे. हा खेळ त्यांनी घरातच बसून त्यांचे वडिल आणि बहिण-भाऊ यांच्यासोबत खेळला. 

 

यात 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूमामा साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेने त्याचे वडिल आणि त्याच्या लहान बहीणीसोबत हा खेळ खेळला

 

 

तर स्वामिनी मालिकेतील सृष्ठी पगारेने देखील तिचे वडिल आणि बहिणीसोबत या धमाल खेळाचा आनंद  लुटला.

 

 

राजा राणीची गं जोडी मालिकेतील अभिनेता मनीराज पवारने त्याचे वडिल आणि भावासोबत हा खेळ खेळला. यावेळी त्याच्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी समोर आल्या. 

 

तर याच मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनारनेही तिचे वडिल आणि भावासोबत या खेळाचा आनंद लुटला.

या खेळातून या कलाकारांच्या विविध गोष्टींची माहिती मिळाली. या खेळात समोर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं एकमेकांकडे इशारे करून सांगायची होती. या कलाकारांना त्यांच्या वडिलांसोबत आणि भावा-बहिणींसोबत हा खेळ खेळायला मजा आली असेल एवढंं नक्की.

Recommended

Loading...
Share