By  
on  

नवा रिएलिटी शो 'सिंगिंग स्टार' लवकरच रसिकांच्या भेटीला

करोना संकटामुळे लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा जुन्या मालिकांच्या चित्रिकरणाचा श्रीगणेशा झाला. पण या संकटात नवे कार्यक्रमसुध्दा भेटीला येणार का याबाबत मात्र शंकाच होती. पण आता हळूहळू अनेक वाहिन्यांवरच्या नव्या कार्यक्रमाची घोषणा होऊ लागल्याने. छोट्या पडद्यावरील कलाकार आणि प्रेक्षकवर्ग दोघांमध्येसुध्दा नवचैतन्य निर्माण झालं आहे. 

'सिंगिंग स्टार' नावाचा नवा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. नुकताच त्याचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे; असे म्हणत हा कार्यक्रम ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात कोण-कोण असणार आहेत आणि हा कार्यक्रम नेमका काय आहे, या गोष्टी मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील असे कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत असते, आता हा नवा कार्यक्रम काय आणि कसा असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये  उत्सुकता आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive