By  
on  

'भाभी जी घर पर हैं' मध्ये गोरी मॅम साकारणार ही नवी अभिनेत्री ?

कानपूरच्या पार्श्वभूमीवर घडणारी सर्वांची लाडकी हिंदी मालिका 'भाभी जी घर पर हैं'बाबत एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. गोरी मॅम म्हणून प्रसिध्द असलेली आणि अनिता भाभी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडनने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे मालिकेत अनिता भाभी म्हणून बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाची वर्षी लागण्याची शक्यता आहे.

'टेली चक्कर' ने दिलेल्या वृत्तानुसार सौम्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असून तिची याबाबत मेकर्ससोबत चर्चा सुरु आहे. तसंच शो सोडण्यामागचं कारण मानधनातीलकपात असल्याचं बोललं जात आहे. तर शेफाली जरीवाला हिला अनिता भाभीच्या व्यक्तिरेखेबद्दल विचारणा केली असता तिने याबबत मौनच बाळगणं पसंत केलं आहे. 

यापूर्वी दोन वर्षांआधी अंगुरी भाभी साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेने ही मालिका सोडली होती. त्यानंतर बराच वादंग निर्माण झाला. त्यानंतर आता अभिनेत्री शुभांगी अत्रे  अंगुरी भाभी साकारते. आता सौम्याने टंडनने खरंच जर ही मालिका सोडली असेल तर 'भाभी जी घर पर हैं'  मालिकेला इतक्या उंचीवर पोहचवणा-या या दोन्ही अभिनेत्रींनी मालिकेला पूर्णविराम दिला असं होईल 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive