By  
on  

अथर्व कर्वे ठरला "महाराष्ट्राचा सुपरस्टार", स्पर्धेचा महाअंतिम सोहळा पडला जल्लोषात पार

 

पुण्याचा अथर्व कर्वे "महाविजेता" होऊन महाराष्ट्राचा सुपरस्टार ठरला आहे. नुकतंच ह्या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जल्लोषात पार पडला. स्पर्धेचे परिक्षक संजय जाधव आणि मकरंद देशपांडे यांनी अथर्वचा  पुरस्कार देऊन गौरव केला. महाराष्ट्रातील 5000 हून अधिक स्पर्धकांमधून 36 स्पर्धक पहिल्या फेरीत निवडले गेले होते. त्यातील 10 स्पर्धक महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरले. ममहाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते,

महाविजेता पदाचे पारितोषिक पुण्याकडे आले याचा अथर्वला विशेष आनंद वाटतो. या शोच्या अगदी सुरुवातीपासूनच अथर्वने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना, परीक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली.विजयी होताच अथर्वने सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे आणि त्याच्या चाहत्यांचे आभार मानले.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive