By  
on  

अजून तरी गोरी मॅमला कोणी रिप्लेस करणार नाही, 'भाभी जी घर पर हैं'च्या निर्मात्यांनी केलं वृत्ताचं खंडन

कानपूरच्या पार्श्वभूमीवर घडणारी सर्वांची लाडकी हिंदी मालिका 'भाभी जी घर पर हैं'बाबत एक बातमी काहीच दिवसांपूर्वी येऊन धडकली ती म्हणजे, यात  गोरी मॅम म्हणून प्रसिध्द असलेली आणि अनिता भाभी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडनने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याची. पण या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी या वृत्ताचं खंडन केलं असून त्या अफवा असल्याचं सांगितलं आहे.  तसंच अनिता भाभी हे पात्र यापुढे काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला साकारणार असल्याच्या चर्चासुध्दा रंगल्या होत्या. 

'भाभी जी घर पर हैं'चे निर्माते म्हणतात, अजून तरी अनिता भाभी साकारणारी सौम्या टंडन शोसोबत आहे. मालिकेचं शूटींग सुरु असून सर्वकाही सुरळीत आहे. मला खरंच नाही माहित या अफवा कशा पसरल्या. तसंच तिच्या जागी दु-या कोणाचीही निवडसुध्दा झालेली नाही. तर एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री शेफाली जरीवाला हिनेसुध्दा आपण भाभीजी साकारत असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. 

दरम्यान, सौम्या टंडनच्या हेअर ड्रेसरला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तिलासुध्दा घातच क्वारंटाईन ठेवण्यात आलं असून काही दिवस शूटींगमधून ब्रेक देण्यात आला आहे,

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive