By  
on  

कुलेस्ट आजोबांना सोहम आणि शुभ्राकडून मिळाल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा !

'कोंबडीच्या'च्या म्हणत नेहमीच बबड्याची कानउघडणी करणा-या सोहमचे लाडके आजोबा. त्यांचा ६ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. अग्गंबाई सासूबाई फेम लाडके आजोबा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन  त्यांच्या वाढदिवसानिमित्त मालिकेतील नातू सोहमकडून त्यांना खास अंदाजात शुभेच्छा मिळाल्या. कुलेस्ट आजोबा म्हणून त्याने रवी पटवर्धन यांना  शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या करोना लॉकडाऊननंतर पुन्हा सुरु झालेल्या अगंबाई सासूबाई मालिकेच्या नव्या भागांत आजोबा साकारणारे रवी पटवर्धन हे गावी असल्याचं सांगण्यात आलं. ज्येष्ठ कलाकारांना सेटवर बंदी असल्याने त्यांच्याविषयीचा फक्त उल्लेख व फोनवरचं संभाषण प्रेक्षकांना पाहायला मिळालं.

सर्वांनाच आजोबा आता पुन्हा कधी सेटवर परतायत असं झालं आहे. तर याशिवाय प्रेक्षकांचे कानसुध्दा... ए कोंबडीच्या, ए चप्पलचोर....माडी हे ऐकण्यासाठी आसुसले आहेत. 

 

65 वर्षांवरील कलाकारांची शुटींग सेटवरची बंदी आता उठली आहे, त्यामुळे कधी एकदा आजोबांचं मालिकेत पुनरागमन होतंय याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive