रणवीर सिंह आणि सारा अली खानसोबत ‘सिंबा’निमित्त दिलखुलास गप्पा

By  
on  

रोहित शेट्टीचा ‘सिंबा’ म्हणजे फुल ऑन धम्माल एन्टरटेन्मेन्ट हे समीकरण आता सर्वांनाच माहिती झालंय. रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सिंबा’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्यांमधून प्रेक्षकांना यात अफलातून काहीतरी पाहायला मिळणार याची कल्पना आलीच असेल. पिपींगमूनशी बोलताना दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाले, मी त्या दिग्दर्शकांपैकी नाही जो प्रेक्षकांना अंधारात ठेवतो. मला जे काही ते त्यांच्यासोबत शेअर करायला आवडतं.

‘सिंबा’निमित्ताने रणवीर सिंह पहिल्यांदाच डॅशिंग सुपर कॉपच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर त्याची सारा नाजूक-साजुक हिरोईन म्हणून सिनेमात झळकते आहे. चला तर मग त्यांच्याचकडून जाणून घेऊया त्यांच्या ‘सिंबा’विषयी.

 

प्रश्न: बॉलिवुड सिनेमांमधील सर्वात अविस्मरणीय पोलिस व्यक्तिरेखा तुमच्या मते कोणती आहे

रणवीर – अमिताभ बच्चन यांची जंजीरमधील व्यक्तिरेखा तर अविस्मरणीय आहेच,परंतु ‘सिंघम’मधील अजय देवगणच्या भूमिकेचा आवर्जुन उल्लेख करावाच लागेल.

सारा-  माझ्यासाठी तर ‘दबंग’चा सलमान खान आहे.

रोहित शेट्टी-  माझ्यासाठी माझा ‘सिंघम’च पोलिसाची अविस्मरणीय व्यक्तिरेखा आहे.

प्रश्न:  प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की त्याला मोठेपणी पोलिस व्हायचं असतं, याबद्दल तु काय सांगशील ?

रणवीर- हो नक्कीच. लहानपणी खुपवेळा मी चोर-पोलिसांचा खेळ खेळलोय. आता अभिनेता झाल्यापासून एकदा तरी डॅशिंग पोलिस साकाराता यावा,अशी इच्छा होती.सिंबामुळे तीसुध्दा पूर्ण झाली.

 प्रश्न:  तुमचा सर्वात आवडता पोलिसपट कोणता?

रणवीर-  अमिताभ बच्चन यांचा जंजीर तर आहेच पण रोहित सेट्टी यांचा सिंघमचा उल्लेख आवर्जुन करावासा वाटतोय.

सारा- ‘सिंघम’ आणि ‘दबंग’ हे माझे दोन आवडते पोलिसपट आहेत.

प्रश्न: जर तुम्हाला बॉलिवुड पोलिस आणि हॉलिवुड डिटेक्टिव्ह या दोन्हीपैकी एकाची निवड करायची असेल तर ?

सारा: जर माझ्याकडे असं काही कथानक लं तर मी बॉलिवुड पोलिसपटालाच निवडेन. कारण मलासुध्दा बॉलिवुडमध्ये पोलिसाची भूमिका साकारायची हे.

प्रश्न: दिग्दर्शक रोहित शेट्टीकडून सिंबाची ऑफर मिळाली तेव्हा तुम्ही कसं रिअक्ट केलं होतं ?

रणवीर– रोहित सरांसोबत यापूर्वी मी एका जाहिरातीसाठी काम केलं होतं. त्यावेळेस ते मला एकदा म्हणाले होते माझ्याकडे एक अशाप्रकारचं कथानक आहे, तु करणार का, तेव्हा मी क्षणाचाही विलंब न लावता शुटींग कधी सुरु करायचंय असाच सवाल त्यांना केला होता. यावरुन तुम्हाला कळलंच असेल की मी किती उत्साहित होतो. मला अशा प्रकारचा सिनेमा करण्याची तीव्र इच्छा होती आणि रोहित सर या विषयाचे बादशाह आहेत.

प्रश्न जेव्हा रणवीर तुझ्या अपोझिट आहे, हे समजल्यावर तुला कसं वाटलं होतं?

सारा- मी खुप आनंदून गेले होते. बराच वेळ तर मला समजतही नव्हतं की हे सर्व प्रत्यक्षात घडतंय.  

 

प्रश्न- तुम्हाला ‘सिंघम’ आणि ‘सिंबा’ यात काय वेगळेपण दिसून येतो?

 रणवीर सिंह सिंघम आणि सिंबा या दोन्ही व्यक्तिरेखा अगदी सहज मिळत्या-जुळत्या आहेत. पहिल्यांदाच या दोन व्यक्तिरेखा एकत्र येत आहेत आणि हा कारनामा फक्त रोहित सरच करु शकतात. सिंबातील संग्राम भालेराव ही व्यक्तिरेखा तुमच्या अपेक्षांवर शंभर टक्के उतरेल यासाठी मी जीवतोड प्रयत्न केलाय.

सारा – सिंबा तुम्हाला नक्की आवडेल आणि संपूर्ण परिवारासोबत तुम्ही या सिनेमाचा आनंद घेऊ शकाल याची आम्हाला खात्री आहे.

 

Recommended

Loading...
Share