या बॉलिवूड सेलिब्रिटींची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी, पाहा कोण कोण आहे या यादीत

By  
on  

सध्या सगळीकडे रंगीबेरंगी वातावरण आहे. होळीच्या रंगांचा उत्साह प्रत्येकाच्या चेह-यावर दिसू लागला आहे. या धामधुमीत बॉलिवूड्कर कसे बर मागे राहतील. बॉलिवुडमधील काही जोड्यांसाठी ही होळी खास आहे कारण ही त्यांची लग्नानंतरची पहिली होळी आहे. कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी पाहू जरा

दीपिका- रणवीर :

बॉलिवूडच्या या सिझलिंग कपलची लग्नानंतरची ही पहिलीच होळी आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये या दोघांनी लग्न केलं होतं.

सोनम आनंद :

फॅशन दिवा सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांची ही पहिलीच होळी आहे. बॉलिवूडची ही फॅशन लेडी ही पहिली होळी कशी साजरी करते ते लवकरच कळेल.

प्रियांका-निक :

देसी गर्ल प्रियांका आणि परदेसी मुंडा निक जोनास यांचीही पहिली होळी आहे. प्रियांकाला होळी नवी नसली तरी पती निकसाठी होळीचा पहिलाच अनुभव असणार आहे.

नेहा-अंगद :

बोल्ड आणि ब्युटिफुल नेहा धुपिया मागील वर्षी अंगद बेदीसह लग्नाच्या बेडीत अडकली. नेहा आता मेहेर नावाच्या गोड मुलीची आई बनली आहे. त्यामुळे ही होळी नेहासाठी खुप स्पेशल आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share