बिग बी अमिताभ बच्चन यांचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय तो पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर. गुलाबो सिताबो या सिनेमातून महानायकाची आयुष्मान खुरानासारख्या गुणी तरुण कलाकारासोबत धम्माल केमिस्ट्रूी पाहायला चाहते उत्सुक आहेत. घरमालक व भाडेकरुच्या आंबट-गोड नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. बिग बींनी यात चक्क जर्जर म्हाता-याची भूमिका साकारलीय
प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करुन जर्जर झालेला म्हातारा साकारणारे बिग बी यांची या सिनेमातली एनर्जी पाहण्यासाठी सर्वांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. करोना पार्श्वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर शूजित सरकार दिग्दर्शित गुलाबो सिताबो सिनेमाच्या प्रदर्शनानिमित्त पिंपींगमूनचे संपादक मार्क मॅन्युअल यांच्या प्रश्नांना महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलेली ही उत्तरं.
अॅंग्री यंग मॅन ते पिकू आणि आता गुलाबो सिताबो मधील ज्येष्ठ नागरिक साकारणा-या भूमिका तुम्ही लिलया पेलता, तुम्ही म्हणाल मी दिग्दर्शकाचा अभिनेता आहे, पण कोणत्या भूमिका तुमच्यासाठी सहज होत्या ?
उत्तर –क्रिएटीव्ह टीमकडून ह्या व्यक्तिरेखा खुप बारकाईने तया्र केल्या गेल्या आहेत मी फक्त त्यांनी जे काही माझ्या व्यक्तिरेखेसाठी लिखाण केलं आहे त्याचं पालन केलं. कुठलंही काम एक प्रोफेशनल असल्याने मी ते प्रामाणिक करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. कुठलंच काम सहज होत नाही, त्यासाठी सर्वांचं टीम वर्क महत्त्वाचं ठरतं.
मिर्झा या गुलाबो-सिताबोच्या व्यक्तिरेखेत तुम्ही सहज उतरलात, हे तुम्ही कसं मॅनेज केलंत...लखनऊसुध्दा इलाहाबाद सारखंच आहे का, त्यामुळे तुम्हाला भूमिकेसाठी मदत झाली.
उत्तर – मी मिर्झाच्या व्यक्तिरेखेत चपखल बसलोय की नाही हे प्रेक्षकच ठरवतील. पण खरंच जर ही व्यक्तिरेखा तुम्हाला अगदी हुबेहूब वाटली तर त्याचं श्रेय हे लेखिका जुही चतुर्वैदी आणि दिग्दर्शक शूजित सरकार यांना जातं. या दोघांनी दाखवलेल्या मार्गाने मी फक्त या भूमिकेसाठी चालत राहिलो. लखनौ आणि इलाहाबाद ही दोन सांस्कृतिक शहरं आहेत. त्यांना इतिहास आहे. इलाहाबादमध्ये लहानाचा मोठा झाल्याने तिथले संस्कार मी कधीच विसरु शकत नाही तर कर्मभूमीसुध्दा तुमच्यासाठी नेहमीच खास असते.
कोलकातामध्ये पिकूच्या शूटींगदरम्यान तुम्हाला कोणीच ओळखलं नव्हतं, तिच बाब गुलाबो सिताबोच्या मिर्झासोबत घडली. यावेळीसुध्दा तुम्हाला सामान्यांनी ओळखलं नाही, हा अनुभव किती रंजक होता?
उत्तर – खळखळून हसत...मी देश किंवा जगाचा खुप प्रसिध्द चेहरा नाहीए. मी कोलकातामध्ये ७-८ वर्ष राहिलो आहे, पिकूच्या शूटींगदरम्यान मी तेथील रस्त्यांवर फिरायचो. मला शूटींग दरम्यान आणखी फिरायची इच्छा होती.
आणखी एक म्हणजे १९७० साली तुमच्याकडे अशी कोणती गोष्ट नव्हती जी आत्ताच्या इंडस्ट्रीतील पिढीकडे आहे आणि तसंच ही तरुण पिढी तुम्हाला घाबरतेसुध्दा पण तुम्हीसुध्दा त्यांच्यात तितकेच छान मिसळतात.
उत्तर – इंडस्ट्रीतल्या नव्या पिढीकडे प्रतिभा व आत्मविश्वास ठासून भरलाय , जो माझ्याडे कधीच नव्हता व नसेल. ही नवी पिढी खुप हुशार आहे. उलट मलाच त्यांची भिती वाटते.त्यांच्यासोबत काम ेल्यावर नेहमीच नवं काही शिकायला मिळतं.