By  
on  

...आणि अनुरागने रंगभूमीला कायमचा राम राम ठोकला

अनुराग कश्यप हे नाव दिग्दर्शनाच्या क्षेत्रातच नाही तर अभिनयाच्या क्षेत्रातही आहे हे फारच थोड्या लोकांना माहीत आहे. पण त्याने करीअरच्या सुरुवातीलाच अभिनयाला रामराम ठोकला होत, हे मात्र फारच थोड्या लोकांना माहिती आहे. अनुराग कश्यपने करीअरची सुरुवात पृथ्वी थिएटरपासून केली. त्यावेळी मकरंद देशपांडे हा कलाकारही त्याच्यासोबत होता. त्यावेळी मकरंदने सर सर सरला हे नाटक लिहिलं होतं. या नाटकात अनुरागही काम करत होता.
या नाटकाचा पहिला भाग यशस्वी झाला. त्यामुळे मकरंदने दुसरा भाग लिहिला. हे नाटक देखील रंगभूमीवर सादर केलं जाऊ लागलं. पण हा दुसरा भागही प्रेक्षकांना आवडल्यामुळे तिसरा भागही मकरंदने लिहिला. आता या नाटकाचे तिन्ही भाग एकावेळी म्हणजे जवळपास नऊ तास रंगभूमीवर सादर केले जाऊ लागले.
या रोजच्या नऊ तासांच्या वेळापत्रकाला कंटाळून अनुरागने त्यावेळी जो रंगभूमीला रामराम ठोकला तो आजतागायत कायम आहे. ही आठवण एका कार्यक्रमादरम्यान अनुरागने प्रेक्षकांना सांगितली.

Recommended

PeepingMoon Exclusive