प्रियांका- निकच्या रिसेप्शनमध्ये दिसला बॉलिवूडचा झगमगाट

By  
on  

बॉलिवूडमध्ये सध्या गडबड सुरु आहे ती प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या रिसेप्शनची. प्रियांका आणि निकचं हे दुसरं रिसेप्शन आहे. या रिसेप्श्नला बॉलिवूडमधील नामांकितांनी हजेरी लावली आहे. पाहुया कोण कोण आलंय पीसी आणि निकच्या रिसेप्शनला...

प्रियांका जवळचा मित्र सलमान काळ्या सुटमध्ये या कार्यक्रमास पोहोचला. प्रियांकाने भारत अचानक सोडल्याने नाराज असलेला सलमान मैत्रिणीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या प्रसंगाला नाराजी सोडून आला.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील पती निरंजन नामजोशी आणि मुलीसह या रिसेप्श्नला हजेरी लावली.

प्रसिद्ध दिग्दर्शक मधूर भांडाकर हे देखील उपस्थित होते.

अभिनेत्री काजोल आणि आशाताई यांनी उपस्थिती लावली.

अभिनेत्री कंगना राणावतने बहिण रंगोलीसह या रिसेप्शनला उपस्थिती लावली.

रिसेप्शनला आलेल्या कतरिनाने दिलखेचक स्माईलसह फोटोग्राफरर्सना पोझ दिली.

रिसेप्शनमध्ये उर्मिलाची एंट्री लक्षवेधक ठरली.

‘न्यु मॉम’ सानिया मिर्जाने देखील रिसेप्शनला हजेरी लावली.

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात दीपवीर यांनी देखील लाडक्या काशीबाईंच्या म्हणजेच प्रियांकाच्या रिसेप्शनला हजेरी लावली.

Recommended

Loading...
Share