समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था यातील खलप्रवृत्तीवर भाष्य करणाऱ्या ‘पाटील’ चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यातल्या बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. प्रेक्षक आग्रहास्तव ‘पाटील’ येत्या २८ डिसेंबरला पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., सचिकेत प्रोडक्शन्स,शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. निर्मित ‘पाटील संघर्ष... प्रेम आणि अस्तित्वाचा’ या चित्रपटात प्रेरणादायी संघर्षकथेची राजकीय पार्श्वभूमी दाखवतानाच कृष्णा आणि पुष्पा यांची हळुवार प्रेमकथा पहायला मिळणार आहे.
तत्पूर्वी राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींंसाठी या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगचं आयोजनही केलं होतं. राज्याच्या विधीमंडळाचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते या खास शोसाठी आवर्जून उपस्थित होते. यात आमदार श्री.डी.पी सावंत, श्री.बच्चू कडू, श्री.सतेज पाटील, श्री.प्रशांत ठाकूर, श्री.प्रसाद लाड, श्री.रामराव वाडकूते, श्री. संतोष टार्फे, श्री. राजेंद्र नजरधाने, श्री. तानाजी मुटकुळे, श्री.हेमंत पाटील अशा विविध पक्षांच्या १०० हून अधिक आमदारांनी हा चित्रपट पाहिला. स्क्रीनिंगनंतर सर्वपक्षीय नेतेमंडळींनी कलाकारांच्या अभिनयकौशल्याची आणि चित्रपटाची प्रशंसा केली. चित्रपटाचं कथानकही उपस्थितांची दाद मिळवून गेलं. राजकीय नेत्यांना भावलेला ‘पाटील’ प्रेक्षकांची मनं जिंकतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या आणि अतिशय खडतर परिस्थितीचा सामना केलेल्या संतोष राममीना मिजगर यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेल्या ‘पाटील’ चित्रपटात एस.आर.एम एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, यश आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.