By  
on  

दीपिका पदूकोणनंतर या कलाकाराने दिली डिप्रेशनमध्ये असल्याची कबुली

सध्या नेहा कक्कर चर्चेत आहे. पण यावेळी नेहा चर्चेत असण्याचं कारण तिचं गाणं नाही तर डिप्रेशन आहे. नेहाचं अभिनेता हिमांश कोहलीसोबत अफेअर होतं. हिमांशने इंडियन आयडलच्या सेटवर नेहाला प्रपोजदेखील केलं होतं. पण काही दिवसांनी अचानक त्यांच्या नात्यात कडवटपणा आला आणि नेहा-हिमांशचं ब्रेक अप झालं.

नेहाने या बाबीचा खुलासा सोशल मिडियावरून केला. ब्रेक अपनंतर नेहाने सावरत असल्याचंही चाहत्यांना सांगितलं होतं. पण नेहा ब्रेक अपच्या धक्क्यातून अजूनही पूर्णपणे सावरली नसल्याचं दिसून येत आहे. नेहाचं प्रोफेशनल आयुष्य सध्या यशोशिखरावर आहे. असं असलं तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र सारं काही आलबेल नाही.

नेहाने एक पोस्टद्वारे आपण डिप्रेशनमध्ये असल्याची कबुली दिली आहे. अलीकडेच हैद्राबादमधील एक लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यात गातागाताच तिला रडू कोसळल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. या प्रसंगानंतर नेहाने डिप्रेशनमध्ये असल्याची कबुली दिली होती. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तीने डिप्रेशनमध्ये असल्याची जाहीर कबुली देण्याची ही पहिलीच वेळ नाही.

याआधी दीपिकानेही डिप्रेशनमधून गेल्याची कबुली एका मुलाखती दरम्यान दिली होती. आयुष्य आणि करीअरमधील सतत चढ-उतारामुळे डिप्रेशन आल्याचं दीपिकाने यावेळी कबुल केलं होतं.

 

आता नेहाने देखील अशी कबुली दिली आहे. नेहा डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील असून पुढील लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये जोरदार परफॉर्मन्स करण्याचं प्रॉमिसही तिने चाहत्यांना केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive