नव्या वेबसिरीजमधून अभिनेते शरद पोंक्षे करत आहेत ओटीटीवर एन्ट्री , चित्रीकरणाचा शुभारंभ

By  
on  

 प्लॅनेट मराठी एकामागोमाग एक विविध वेबसिरीज आणि सिनेमाचं चित्रीकरण सध्या करत आहे. यातच आता एका नव्या वेबसिरीजचीही भर पडली आहे. नुकत्याच या नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झालेला आहे. अद्याप या वेबसिरीजचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र या वेबसिरीजमध्ये कोणते कलाकार झळकतील हे समोर आलय. अभिनेते शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, तेजस बर्वे, पर्ण पेठे, उदय नेने अशी स्टारकास्ट या सिरीजमध्ये पाहायला मिळेल. अभिनेते शरद पोंक्षे या वेबसिरीजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. ही वेबसिरीज सहा भागांची असून यात एक कौटुंबिक कथा पाहायला मिळेल. 

 

 या वेबसिरीजबद्दल प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''आजवर हाताळलेल्या विषयांपेक्षा हा जरा वेगळाच विषय आहे. ही वेबसिरीज प्रेक्षक आपल्या आयुष्याशी कुठेतरी जोडू शकतात. ही सिरीज ज्या विषयावर आधारित आहे, तो विषय खरोखरच गंभीर होता. मात्र तरीही आम्ही या गंभीर विषयाला विनोदाची जोड देत, अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने हा विषय मांडला आहे. अभिनयात पूर्ण मुरलेले कलाकार असल्याने या सर्व जणांनी आपापल्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे.'' 

    वर्जिनोशन्सची प्रथम निर्मिती असणाऱ्या या वेबसिरीजचे दिग्दर्शन अमित कान्हेरे यांचे असून योगेश विनायक जोशी यांनी संवादलेखन केले आहे. तर प्रतीक व्यास, अमित कान्हेरे यांनी निर्मिती केली आहे. विशाल संगवई यांनी डीओपीचे काम पाहिले असून ओंकार महाजन क्रिएटीव्ह प्रोड्युसर आहेत. रोहन-रोहन यांनी या वेबसिरिजला संगीत दिले आहे.

Recommended

Loading...
Share